For International Admissions : +919814154321 headinternational@ritindia.edu|Contribute to Alumni Gratitude Fund| 0% Education Loan Facility Available
इस्लामपूर येथील राजारामबापू इन्स्टिटयूट ऑफ टेकनॉलॉजि या स्वायत्त महाविद्यालयात सेवानिवृत्त एअर मार्शल अरुण गरुड यांनी अकरावीच्या आणि बारावीच्या विद्यार्थ्यांना " परिणामसाध्य अभ्यास कसा करावा" आणि अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन विभागातील विद्यार्थ्यांना " परिणामकारक नेतृत्व" या दोन महत्वाच्या विषया संदर्भात मार्गदर्शन केले. भारतीय वायुसेनेत ४० वर्षाची प्रदीर्घ सेवा झाल्यानंतर एअर मार्शल अरुण गरुड विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रगती तथा भारतीय सशस्त्र सेना मध्ये नोकरीच्या संधी याविषयी मार्गदर्शन करतात.
अशाच प्रकारच्या एक उपक्रम आर. आय.टी.महाविद्यालयामध्ये आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना वाचन कौशल्याचे महत्व पटवून सांगताना त्यांनी सांगितले कि वाचनाची व्यापकता मोठी असावी सर्व विषय समावेशक वाचन आपल्याला प्रदीर्घ ज्ञान देऊन जाते. तसेच विद्यार्थी अवस्थेत जोपासलेला वाचनाचा छंद तुम्हाला अपेक्षित परिणाम आणि चांगले नेतृत्वगुण विकसित करतात. भारतीय सशस्त्र सेनेत भरती होण्यासाठी काही महत्वाच्या कौशल्याची आणि संयमाची गरज असते योग्य मार्गदर्शन आणि त्या क्षेत्राची योग्य माहिती तुमचे हे स्वप्न पूर्ण करण्यात तुम्हाला मदत करेल. तसेच समाजाचा विविध अंगी अभ्यास देखील तुम्हाला सर्व क्षेत्रात अग्रेसर राहण्यास मदत करतो असे प्रतिपादन केले.
याप्रसंगी कासेगाव शिक्षण संस्थेचे सचिव आर.डी.सावंत सर, आर आय टी महाविद्यालयाच्या डायरेक्टर प्रा. डॉ.सुषमा कुलकर्णी मॅडम, डीन अकॅडमिक्स डॉ.एस.के.पाटील सर उपस्थित होते.
![]() |
![]() |
![]() |
![]() |